हसलगन ग्रामपंचायत

ग्रामपंचायत हसलगन

ता.औसा जि.लातूर

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Smt. Sunetra Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Varsha Thakur
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.लातूर
श्रीमती. वर्षा ठाकूर - घुगे (भा.प्र.से)
Rahul Kumar Meena
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर
श्री. राहुल कुमार मीना (भा.प्र.से)
श्री. बाळासाहेब वाघ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पं),जिल्हा परिषद लातूर
श्री. बाळासाहेब वाघ
Anandkumar Mirgane
गट विकास अधिकारी, औसा
श्री. आनंदकुमार मिरगणे
Anandkumar Mirgane
सरपंच – हसलगन ग्रामपंचायत श्री गोविंद बाबुराव कोराळे
Anandkumar Mirgane
उप-सरपंच– हसलगन ग्रामपंचायत श्री गोपाळ व्यंकटराव शिंदे
Anandkumar Mirgane
ग्रामपंचायत अधिकारी – हसलगन ग्रामपंचायतश्री. लोंढे विशाल गोविंद

गावा विषयी

मौजे हसलगण (सं) हे लातूर शहराच्या दक्षिण दिशेला, लातूरपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर वसलेले एक प्रगतिशील गाव आहे. हे गाव धाराशिव लोकसभा मतदारसंघात व औसा विधानसभा मतदारसंघात मोडते.
सन २०११ च्या जनगणनेनुसार, गावाची लोकसंख्या ४३१३ असून ७१४ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत.

गावात भव्य ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारे सर्व नागरिकांना वेळेवर संगणकीकृत दाखले व ऑनलाईन सेवा दिल्या जातात.

गावात श्रीराम मंदिर, तसेच हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, पिण्याचे पाणी, बाकडे व शेडची व्यवस्था करण्यात आली असून ते ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे.

गावातील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, डिजिटल शिक्षण प्रणाली, प्रोजेक्टर व सुंदर बेंचेस यांच्या साहाय्याने विद्यार्थी १००% उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

गावाचा इतिहास

हसलगण (सं)  हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध गाव आहे. गावातील प्राचीन मंदिरे, वार्षिक यात्रा आणि धार्मिक परंपरा हे गावाच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. जुनी लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक सण या गावाच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात.

अधिक वाचा …

लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
प्रकल्प चालू
0

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने केलेली कामे...

सरपंच श्री गोविंद बाबुराव कोराळे ...

सन 2023 पासून ग्रामपंचायतीच्या कार्यभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामसेवक, सदस्य आणि विविध विभागांच्या सहकार्याने हसलगण (सं) ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

ग्रामपंचायतीने “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना”जनसुविधा योजना यांच्या अभिसरणातून अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी गायींचे गोठे उभारणी, निराधार, अपंग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन योजना, तसेच महिला बचत गट प्रशिक्षण, रोजगार निर्मिती उपक्रम, बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी, सौर ऊर्जेवर चालणारी ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शेतरस्ते विकास, बालविवाह बंदी, प्लास्टिक बंदी यांसारख्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, आणि सतत प्रगती यांचा आदर्श उभा केला आहे.

आमचे उद्दिष्ट केवळ भौतिक विकास नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे सामाजिक विकास साधणे हे आहे. हसलगण (सं) गाव आदर्श आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्याच्या दिशेने निश्चितपणे पुढे जात आहे.

“गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे.”

— श्री. गोविंद बाबुराव कोराळे
सरपंच, हसलगण (सं)
+91 8888516150

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा
तारीख नोटिस शीर्षक तपशील
३० सप्टेंबर २०२५
पाणीपुरवठा बंद सूचना
ग्रामपंचायत हद्दीत देखभाल कामांमुळे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील.
२५ नोव्हेंबर २०२५
ग्रामपंचायत कर भरणा सूचना
२०२५-२६ वर्षाकरिता घरपट्टी व पाणीकर भरण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२५ आहे. वेळेत भरणा करा.
०३ डिसेंबर २०२५
विशेष कर सवलत मोहीम सुरू
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत निवासी मालमत्ता कर सवलतीसंदर्भात महत्वपूर्ण तातडीची सूचना!
  • जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू.

  • गावात सौर ऊर्जेवर आधारित रस्ते दिवे बसविण्याचा प्रकल्प मंजूर.

  • स्वच्छ ग्राम – हरित ग्राम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल पेमेंट काउंटर सुरू.

  • नागरिकांसाठी “SmartGaav Citizen Portal App” लवकरच उपलब्ध होणार.

प्रकल्पाचे नाव विभाग कामाचा टप्पा अंदाजे खर्च
जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन विस्तार
पाणीपुरवठा विभाग
७५% पूर्ण
प्रकल्पाचे नाव विभाग कामाचा टप्पा अंदाजे खर्च
जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन विस्तार
पाणीपुरवठा विभाग
NA
सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही.
सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही.

प्रमुख कार्यक्रम

लाभार्थी रजिस्टर

सरकारी योजना

गावातील छायाचित्रे , ध्वनिचित्रफित

छायाचित्र दालन

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा

 आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.

Instagram वर आम्हाला फॉलो करा — ताज्या अपडेट्ससाठी.कार्यक्रम आणि घोषणा यांचे अपडेट्स